Image For Representation (Photo Credits-Facebook)

नागरिकत्व विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर ईशान्य भारतापासून ते दिल्ली आणि आता मुंबईत आंदोलने केली जात आहे. तर मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे महाविद्यालयातील विद्यार्थी आंदोलनासाठी उतरणार आहेत. त्यामुळे या आंदोलनादरम्यान कोणताही हिंसाचार होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. त्याचसोबत मुंबई पोलिसांनी आजच्या आंदोलनादरम्यान वाहतूकीच्या मार्गात बदल केले असल्याचे ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

वाहतुकीचे निर्बंध 12 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत ऑगस्ट क्रांती मार्गपासून ते ग्रॅन्ड रोड रेल्वे स्थानकापर्यंत नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचसोबत वाहनांना वाहतुक निर्बंध दरम्यान प्रवेश बंदी आणि पार्किंग न करण्याचे आवाहन केले आहे.(CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज मुंबई महाविद्यालयातील विद्यार्थी ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करणार)

Mumbai Police Tweet:

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ईशान्य भारतात आंदोलने सुरुच होती. त्यानंतर या आंदोलनाचे परिणाम दिल्लीत सुद्धा दिसून आले. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 15 डिसेंबरच्या रात्रीपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तसेच आंदोलकांनी विद्यापीठाजवळील भागामध्ये बसेस पेटवून दिल्या. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या परिसरात घुसत अश्रुधुराचा वापर केला. तसेच पोलीस विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत असल्याचे व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.