
सध्या राज्यात उष्णतेची लाट सुरु असून त्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. मुंबईचे (Mumbai) तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे त्याचा त्रास नागरिकांना होताना दिसून येच आहे. तर मुंबईत आज (29 एप्रिल) तापमानाचा पारा 35 अंशावर जाऊन पोहचणार आहे. परंतु ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर आज मुंबईत चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा 45 अंशावर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे मतदानाच्या वेळी नागरिकांनी दुपारच्यानंतर बाहेर जाण्यास पसंद केले होते.
(Heat Wave In Maharashtra: उन्हाच्या झळांनी विदर्भ तापला, महाराष्ट्रातही पारा वाढला)
तर मुंबईसह अन्य ठिकाणी वातावरण अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईकर उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.