Rising Heat In Vidarbha (Photo Credit: Instagram/Ajinkya Surangalikar)

दिवसागणिक वाढत्या तापमाना मुळे मे महिना उजाडायच्या आधीच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.जगभातील देशांमध्ये यंदा भारतात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले आहे. India Meteorological Department (IMD)ने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या अहवालात, भारतातील 15 शहरांना यादीत वरचं स्थान मिळाले आहे.  मुख्य  म्हणजे यातील सहा शहरे ही महाराष्ट्रातल्या विदर्भ प्रदेशात असल्याचे सांगण्यात येते आहे

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खारगांव मध्ये सर्वाधिक म्हणजे 46.6 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदवले असून त्या पाठोपाठ विदर्भातील अकोला (Akola) जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे. Heat Wave in Maharashtra: जगात सर्वाधिक उष्ण प्रदेश खरगोन, तर महाराष्ट्रातील अकोला दुसर्‍या स्थानी; वर्ल्ड वेदर टुडे चा अहवाल

विदर्भात दरवर्षीच मार्च पासून उन्हाचा तडाखा असा काही वाढतो की दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही अशक्य होते, यंदाही अकोल्यात 46.4 डिग्री सेल्सियस इतके तापमान असल्याने नागरिकांची उन्हाने वाईट हालत झाली आहे. अकोल्याच्या मागोमाग अमरावती (45.4), ब्रम्हपुरी (45.8), चंद्रपूर (45.6), वर्धा (45.7) शहरांमध्ये उन्हाचा पारा दररोज अंश अंशांनी वाढत आहे. यासोबत नागपूरने (45.२) डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदवून देशातील उष्ण शहरांच्या यादीत नववा क्रमांक मिळवला आहे.

विदर्भातील ही अतिउष्ण अवस्था पाहून India Meteorological Department (IMD)ने नागरिकांना पुढील पाच दिवसात तापमान आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसात मध्य भारतात तापमानाची पातळी 47 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे,

महाराष्ट्रात एकूण 9 शहरे या यादीत असून यापाठोपाठ मध्य प्रदेश मधील ३, उत्तर प्रदेशात २ तर तेलंगणामधील एका शहराचा समावेश आहे.