कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Goverment) कडक पावले उचलत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. लोकांनी जास्तीत जास्त घरातच राहावे हा यामागील उद्देश आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी बीएमसी (BMC) कडून देखील अनेक उपाययोजना राबवल्या जात आहे. नुकतेच बीएमसीने कोरोना व्हायरस संबंधित आजचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये आज मुंबईमध्ये कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळले असल्याची तसेच 1 रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या अहवालानुसार आज मुंबईमध्ये 841 लोकांची तपासणी केली गेली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज आणखी दहा कोरोना व्हायरस रुग्ण आढळून आले असून, राज्यात एकूण रूग्णांची संख्या 107 झाली आहे. यात दिलासादायक बाबा म्हणजे, मुंबईत उपचार घेत असलेले कोरोना व्हायरसचे 12 रुग्ण बरे झाले आहेत. नव्याने सापडलेल्या प्रकरणांपैकी पाच मुंबईतील तर एक अहमदनगर जिल्ह्यातील आहे. त्याआधी सकाळी अधिकाऱ्यांनी नवीन चार रुग्णांची नोंद केली होती.
As on 24-March, 4:00pm#NaToCorona https://t.co/gvxJX0e2h1 pic.twitter.com/kCR32uWQ8G
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 24, 2020
बीएमसीने दिलेली आजची माहिती -
> अलगीकरण केलेले एकूण आंतरराष्ट्रीय प्रवासी - 418
> बाहय रुग्ण विभागात तपासणी केलेले एकूण रुग्ण - 841
> एकूण भर्ती झालेले संशयीत रुग्ण - 94
> चाचणी अहवाल 'पॉझिटीव्ह' असलेले रुग्ण (मुंबई) - 4
> चाचणी अहवाल 'पॉझिटीव्ह असलेले रुग्ण (मुंबई बाहेरील) - 1
> मृत रुग्णांची संख्या - 1
> डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण - 60
> रुग्णालयात भर्ती असलेले रुग्ण - 128
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 8 रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली होती. त्यानंतर त्यांचे दोन सलग अहवाल नकारात्मक आले आहेत. सध्या या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येत आहे. आज कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आलेल्या रुग्णांमध्ये 3 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. (हेही वाचा: Coronavirus: वृत्तपत्रांमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही, WHO यांची माहिती)
दरम्यान, एका 65 वर्षीय व्यक्तीस ताप, खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे 23 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात आणण्यात आले होते. सदर व्यक्ती दुबईत वास्तव्यास होती. युएई येथे प्रवास करून 15 मार्च रोजी ही व्यक्ती अहमदाबाद येथे आली. पुढे 20 मार्च रोजी ही व्यक्ती मुंबईत दाखल झाली. या व्यक्तीस उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा त्रास होता. या रुग्णाची स्थितीत गंभीर असल्याने, उपचारादरम्यान 23 मार्च रोजी त्यचा मृत्यू झाला. या व्यक्तीची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली होती.