Air India Flight (PC - Wikimedia Commons)

एअर इंडिया चं (Air India) चं मुंबई-न्यूयॉर्क (Mumbai to New York)Flight AI119 फ्लाईट आज 14 ऑक्टोबर सकाळी दिल्ली विमानतळावर डायव्हर्ट करण्यात आलं आहे. विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिल्यानंतर तातडीने हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. एअर इंडियाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारे प्रवासी सुरक्षित आहेत. नक्की वाचा: Cockroach Finds in Air India Food: एअर इंडियाच्या विमानामध्ये अन्नात आढळले झुरळ; अभिनेते अनुपम खेर यांनी निष्काळजीपणावर उपस्थित केले प्रश्न .

एअर इंडिया कडून विमान वळवल्याची अपडेट

मुंबईच्या Chhatrapati Shivaji Maharaj International Airport वरून हे विमान पहाटे 2 च्या सुमारास टेक ऑफ झाले होते. त्यानंतर काही वेळातच बॉम्बची धमकी मिळाली. सध्या हे विमान दिल्लीच्या Indira Gandhi International Airport आहे. विमान कंपनीकडून सुरक्षेचे सारे नियम पाळले जात आहेत. सध्या दिल्ली पोलिसांसह सार्‍या सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोड वर ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आहे.

यापूर्वी बॉम्बच्या अशा अनेक धमक्या फसव्या ठरल्या आहेत. 5 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला होता, त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. मेल पाठवणाऱ्याने देशातील इतर विमानतळे उडवून देण्याची धमकीही दिली होती.