गाडी चालवण्याबाबत आपल्याला त्याचे नियम माहिती असणे आवश्क असते. तसेच वाहतूक पोलिसांकडून सुद्धा गाडी चालवण्याचे नियम न पाळल्यास दंड किंवा शिक्षा दिली जाते. तत्पूर्वी असाच एक प्रकार मुंबईतील(Mumbai) कार्टर रोड (Carter Road) येथे घडला असून गाडीतून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
तर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, कार्टर रोडवर रात्रीच्या वेळेस एका चारचाकी गाडीतून काही तरुण जात होते. त्यावेळी दोन तरुण चालत्या गाडीच्या मागील बाजूने आपले अर्धशरीर बाहेर काढून स्टंटबाजी करताना दिसून आले. परंतु गाडी सुरु असताना अशा पद्धतीचे वागणे हे अत्यंत चुकीचे असून दुर्घटना घडण्याची शक्यता फार असते. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असते.
(लग्नपत्रीका वाटण्यासाठी पुणे येथून मुंबई शहरात आलेल्या वरबापाचा लोकलमधून पडून मृत्यू)
Lock up, not the red carpet, is the destination of such high rides! Ask those who tried recreating this scene from the silver screen on Carter Road.
Khar police has arrested the three of them u/s 279 & 336 of IPC & u/s 184 of MVA #ReelVsReal #RoadSafety pic.twitter.com/eaa51IxfcU
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 9, 2019
या प्रकरणी खार पोलिसांनी गाडीतून स्टंटबाजी करणाऱ्या तीन तरुणांना अटक केली आहे. तसेच वाहतूकीचे नियम मोडल्याबाबत विविध कलामाअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.