Image Used for Representational Purpose Only | Mumbai Police | (Photo credits: PTI)

मुंबईच्या बोरीवली येथील  गोराई डंम्पिंग ग्राऊंडजवळ (Gorai Dumping Ground) बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ पसरली आहे. बॉम्बशोधक पथक, पोलिस सध्या डंम्पिंग़ ग्राऊंडवर पोहचले असून बॉम्ब सदृश्य वस्तू नेमकी काय आहे याबद्दल तपास सुरू आहे. याबाबतचे वृत्त TV9 ने दिले आहे. काही दिवसांपूर्वी पेण - आपटा एसटी मध्ये बॉम्ब सापडल्याने भीती पसरली होती. त्यानंतर सार्‍या राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये हाय अलर्टचा इशारा दिला होता.MSRTC च्या बसमधून विनापरवानगी पार्सल नेल्यास चालक-वाहक होणार निलंबीत, हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर ST अधिक सतर्क

आज सकाळी साडेआठच्या सुमारास कृष्णा मेनन अकादमी ज्युनियर कॉलेजची बस गोराईवरुन जात असताना बसमधील शिपाई तृप्ती शाह यांना एक संशयास्पद वस्तू दिसली. त्यांनी पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यानंतर ही वस्तू ताब्यात घेण्यात आली आहे.  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये गर्दीची ठिकाणं, रेल्वे स्थानक, लोकल ट्रेन दहशतवाद्यांच्या निशाणावर असतील त्यामुळे दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या मध्य आणि पश्चिम  रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबई लोकलवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा

14 फेब्रुवारी दिवशी जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनेने भारतीय सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान ठार झाले. त्यानंतर काश्मिरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन झाले.