Sunday Mega Block: आज मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडा
Megablock Cancelled | Representational Image | (Photo Credits-Facebook)

आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील मुख्य मार्गिकांच्या दुरुस्तीसाठी आणि काही तांत्रिक कामानिमित्त मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड- माटुंगा अप स्लो मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.58 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील सर्व लोकल सेवा मुलुंड- माटुंगा स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गाने धावणार आहे. सकाळी 11.04 ते दुपारी 3.29 वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट/सेमी फास्ट मार्गावरील ट्रेन सकाळी 10.49 ते दुपारी 2.48 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन फास्ट/सेमी फास्ट लाईनवरील ट्रेन त्यांच्या संबंधित हॉल्ट शिवाय दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहे.

हार्बर लाईन

पनवेल-वाशी अप डाऊन (नेरुळ/बेलापूर-खारकोप लाईन) हार्बर लाईनवर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. पनवेल/बेलापूर ते सीएसएमटीसाठी सकाळी 11.06 ते दुपारी 4.02 वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व लोकल अप हार्बर लाईन मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी ते बेलापूर/पनवेलसाठी सकाळी 10.3 ते दुपारी 3.16 वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व डाऊन हार्बर लाईन मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

ट्रान्स हार्बर

ठाण्यासाठी सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी अप-ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल येथून सकाळी 11.14 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणारी डाऊन ट्रान्स हार्बर लाईन मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या वेळी ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान हार्बर मार्गावरील सर्व सेवा सुरु राहणार आहेत.(Mumbai Marathon 2020: Best Bus सेवांच्या मार्गांमध्ये मोठे बदल; काही ठिकाणी बस सेवा राहणार बंद)

त्यामुळे आज नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक  पाहून घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ब्लॉक दरम्यान काही  विशेष गाड्या सुद्धा धावणार असल्याने त्याचे ही वेळापत्रक नागरिकांनी पहावे.