Mumbai: हिमाचल प्रदेशातील मनाली (Manali) येथून ट्रेकिंगच्या बहाण्याने महाराष्ट्राच्या राजधानीत अमली पदार्थ आणणाऱ्या विद्यार्थ्याला मुंबई (Mumbai) च्या बोरीवली (Borivali) पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. विद्यार्थ्याने मनालीहून ड्रग्ज आणून मुंबईत आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना पुरवले होते. बोरिवली पोलीस आता मनालीतील एका मोठ्या ड्रग्ज विक्रेत्याच्या शोधात आहेत.
बोरिवली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काल दुपारी साडेचारच्या सुमारास एटीसीचे पथक बोरिवली परिसरात गस्त घालत असताना बोरिवली गोविंद नगर परिसरातील नील टॉवर सोसायटीजवळ काही लोक संशयास्पद स्थितीत दिसले. (हेही वाचा - Mumbai: विमानतळाच्या ट्रालीच्या खाली सोने चिटकवून तस्करीचा प्रयत्न, 1.60 कोटी रुपयांचे सोने जप्त, तीन जणांना अटक)
त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याजवळ ड्रग्जची काही पाकिटे सापडली आणि पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, हे उच्च दर्जाचे मनाली ड्रग्ज असल्याचे आढळून आले. या व्यक्तीकडे चौकशी केली असता, मुंबईतील कांदिवली पोईसर भागातील रहिवासी असलेला एक विद्यार्थी अनेक दिवसांपासून अंमली पदार्थांच्या व्यवसायात गुंतल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता असे आढळून आले की, हा विद्यार्थी ट्रेकिंगच्या बहाण्याने मनालीला जातो आणि तेथून तो ड्रग्जची खेप मुंबईत आणून पुरवतो.
तपासात पोलिसांना कळले की, आरोपी विद्यार्थी यापूर्वी दोन ते तीन वेळा मनालीला गेला होता आणि तो चरस आणून विद्यार्थ्यांना पुरवत असे. बोरिवली एटीसीच्या पथकाने मनाली येथील विद्यार्थ्याला चरस देणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.