Arrest | Pixabay.com

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी 25 वर्षीय तरूणाला वडीलांचा खून करण्याच्या प्रयत्नामध्ये अटक केली आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, मुलगा बेरोजगार असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून रागाच्या भरात डंबेल्सच्या मदतीने या मुलाने वडीलांवर 3 वेळेस हल्ला केला. अरोपी मुलाचं नाव Nouman Sheikh आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, Nouman Sheikh हा त्याचे 50 वर्षीय वडील Samad Sheikh यांच्यासोबत जुहू मध्ये एका चाळीत राहत होता. त्यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. मुलगा नोकरी करत नसल्याने Samad Sheikh सतत त्याला सुनवत होते. अशाच एका वादात मुलाने थेट बापाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी देखील बाप-लेकाचा वाद झाला. यामध्ये Nouman ने डंबेल्स हाती घेतलं आणि वडिलांवर वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रागाच्या भराने आजुबाजूच्या भागातील गाड्यांचे देखील नुकसान केले आहे. या मुलाचे वडील एका बांधकाम व्यावसियाकडे वाहन चालक म्हणून काम करत आहेत तर मुलगा कॉलेज ड्रॉप आऊट आहे. अनेक वर्ष तो बेरोजगार आहे. कामही नाही आणि पुढे शिक्षण घेण्याचीही इच्छा नसल्याने वडिलांसोबत त्याचे वाद होत होते.

पोलिसांनी सांगितले की, पिता-पुत्रातील वाद इतका वाढला की समदने आपल्या मुलाला घराबाहेर हाकलून दिले. त्याच्या पत्नीने त्याचे मन वळवल्यानंतरच त्याने नौमनला महिनाभर आधी घरी परत येऊ दिले. शुक्रवारी त्याची आई हसिनाबी हिने त्याला घरात येण्याची परवानगी दिली असता समद जागा झाला आणि त्याने नौमनवर आरडाओरडा सुरू केला. यामुळे संतापलेल्या नौमनने डंबेल उचलले आणि वडिलांना तीनदा मारले.