Mumbai Shocker: 26 वर्ष शेजारी राहणार्‍या महिलेवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग सह लैंगिक छळ करणार्‍या 65 वर्षीय  पुरूषाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीला लैंगिक छळ (Sexual Harassment)  करत असल्याच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. 51 वर्षीय महिलेने तक्रार केली असून मागील 26 वर्ष संबंधित व्यक्ती त्रास देत असल्याचं तिने म्हटलं आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, तिला ब्लॅकमेलिंग (Blackmailing) , बलात्काराच्या (Rape) , खंडणीच्या  (Extortion)  धमक्या येत होत्या. सूनेला आपल्यासोबत झोपायला पाठवण्यासाठीचाही दबाव असल्याचं तिने तक्रारी मध्ये म्हटलं आहे.

TOI च्या रिपोर्टनुसार, सातत्याने आरोपीकडून महिलेला आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ पाठवले जात होते. मुंबईच्या एनएम जोशी मार्ग पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. Information Technology Act अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पुण्यामध्ये वास्तव्याला होता. त्याच्यावर बलात्कार, खंडणी आणि लैंगिक छळाचे आरोप आहेत. Gurugram Shocker: Wife-Swapping Parties मध्ये पत्नीवर जबरदस्ती करणारा पती अटकेत .

महिला ही मुंबई सेंट्रल मध्ये एका चाळीतील रहिवासी आहे. 1996-97 च्या तक्रारीनुसार आरोपी हा तिच्या नवर्‍याचा मित्र होता. घरी कुणीच नाही ही संधी साधत त्याने बलात्कार केला. आरोपी हा श्रीमंत आणि प्रभावशाली असल्याने तक्रार करायला धजावत नव्हती. तिने बहिणीला सारा प्रकार सांगितला तेव्हा तिने कुटुंबासह घर सोडावं असे सांगण्यात आले. त्यावेळी ही महिला ठाण्याला स्थलांतरित झाली. 2002 साली तिच्या पतीचं टीबी ने निधन झाले.

2011 साली कांदिवली मध्ये एका मार्केट मध्ये त्यांची भेट झाली तेव्हा आरोपीने पत्ता आणि मोबाईल नंबरची मागणी केली. जेव्हा मागणी नाकारण्यात आली तेव्हा मुलांना बलात्काराबद्दल सांगू अशी धमकी देण्यात आली. तेव्हा नाईलाने सारी माहिती महिलेने दिली आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यास सुरूवात झाली.

डोंबिवली, ठाणे, वसई मध्ये विविध लॉजेसवर तिला बोलावण्यात आले. मात्र जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिच्यावरील जुन्या अत्याचारांचे व्हिडिओ, फोटोज दाखवून तिला धमकवण्यात आले. यासोबतच तिच्याकडून पैशांची देखील मागणी करण्यात आली. मागील 4-5 वर्षामध्ये आरोपीने पिडीतेला धमकावले तिच्याकडून 5-6 लाख उकळले. त्यानंतर जाचाला कंटाळून महिला वरळीला एका चाळीत रहायला आली.

फेब्रुवारी 2021 मध्ये त्याने मुलाच्या लग्नासाठी 2.5 लाख मागितले. त्यावेळीही जुन्या व्हिडिओचा धाक दाखवला. त्यावेळी महिलेने आपले दागिने गहाण ठेवून पैशांचा व्यवहार केला. जून महिन्याने त्याने महिलेला दादर स्टेशनवर भेटायला बोलावले. येथे आता तू म्हातारी झालीस तुझ्याऐवजी आता तुझ्या सूनेला पाठव असं म्हटलं. आता अत्याचार यापुढे जाऊ द्यायचा नाही असा निर्धार करून अखेर पोलिस स्टेशन गाठलं.