Raped (representationla image)

मुंबई मध्ये 20 वर्षीय मुलाने 17 वर्षीय मुलीसोबत मैत्री करून तिला लैंगिक अत्याचार, बलात्काराची भीती दाखवत दीड लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवत काही खाजगी फोटो काढले होते. हे फोटो प्रसिद्ध करण्याची भीती दाखवत त्याने पैसे उकळले. या आरोपी मुलाला धारावीच्या (Dharavi) शाहू नगर पोलिसांनी (Shahu Nagar Police) अटक करून गुन्हा दाखल करून घेतला आहे.

आरोपी वांद्रे पूर्व भागातील रहिवासी आहे. त्याच्यावर Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सध्या त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या दोघांची भेट इंस्टाग्राम वर झाली. तेथेच त्यांनी मोबाईल नंबर एक्सचेंज केले आणि हळूहळू त्यांची मैत्री वाढली. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झाले. हे देखील नक्की वाचा: Mumbai Crime: सावधान! पोलिस आयुक्तांचा फोटो वापरुन मेसेजद्वारे मुंबईकरांची फसवणूक.

TOI च्या वृत्तानुसार, मागील वर्षी ते दोघं एकत्र फिरायला गेले होते. तेव्हा 17 वर्षीय पीडीतेवर आरोपी मुलाने बलात्कार केल्याचा दावा केला जात आहे. काही महिन्यांनी त्याने तिला 'आक्षेपार्ह स्थिती'मधील काही फोटोज, व्हिडिओ दाखवले. त्याच्यावरून पीडीतेला ब्लॅकमेलिंग करण्याचे, बलात्कार करण्यास सुरूवात झाली. पिडीतेकडून त्याने एक सेकंड हॅन्ड बाईक आणि तीस हजारांचा स्मार्ट फोन देखील घेतला. मुलीच्या पालकांनी तक्रार केली असून त्यांच्या दाव्यानुसार, पालकांच्या अपरोक्ष तिने व्यवहार केले आहेत. पालकांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.

मागील वर्षी अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्राम द्वारा मित्र झालेल्या मुलाने अडीचलाख रूपयाचे दागिने घेतले होते