Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

कांदिवली च्या Shree RJ Makheja High School मध्ये 13 वर्षीय मुलगा पीटी च्या सेशन मध्ये कोसळून मृत्यूमुखी पडला आहे. ही घटना 9 ओक्टोबरची आहे. मृत्यूपूर्वी 10 दिवस आधी त्याला डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूमधून तो बाहेर पडला होता. अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. कांदिवली पोलिसांनी Accidental Death Report रजिस्टर करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मीड डे च्या रिपोर्ट्सनुसार, या मुलाचं नाव ओम सचिन गंडेचा आहे. तो गुजरातचा रहिवासी होता. शिकायला मुंबईच्या कांदिवलीच्या शाळेत होता. Halai Balashram hostel मध्ये तो राहत होता. शाळेच्या पीटीच्या तासाला तो ग्राऊंड वर आला. झाडाखाली बसलेला असताना अचानक तो जमिनी वर कोसळला.

पीटी टीचर संतोष शर्मा यांनी त्याला लगेजच पाणी देत वाचवण्याचा प्रयत्न केला पण मुलाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर त्याला कांदिवलीच्याच हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले, तेथे त्याला मृत जाहीर करण्यात आले आहे. Mumbai Shocker: कुर्ला मध्ये 14 वर्षीय मुलाला एकाच वेळी Dengue, Malaria, Leptospirosis ची लागण; उपचारादरम्यान मृत्यू .

मुलाच्या पार्थिवाचे पोस्ट मार्टम करून बॉडी पालकांकडे देण्यात आली आहे. गुजरात मधून मुलाचे पालक मुंबई मध्ये आले. अद्याप मुलाच्या निधनाचं कारण समजू न शकल्याने तपास सुरू असल्याची माहिती कांदिवली पोलिस स्टेशनचे सिनियर इन्सपेक्टर संदीप विश्वासराव यांनी ही माहिती दिली आहे.

सप्टेंबरमध्ये, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एका शाळेत सराव सत्रादरम्यान दुसर्‍या विद्यार्थ्याने फेकलेल्या भालाफेकीने 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हुजेफा डावरे नावाचा मृत मुलगा त्याच्या बुटाची फीत बांधण्यासाठी खाली वाकला होता आणि त्याला लक्षात आले नाही की ती टोकदार वस्तू त्याच्या दिशेने सरकत आहे. जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पुरर, गोरेगाव येथील आयएनटी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी शाळेच्या मैदानावर भालाफेकचा सराव करत असताना ही विचित्र घटना घडली.