प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना महामाहामारीमुळे (Coronavirus) मुंबईतील जवळपास सर्वच शाळा (Mumbai Schools) गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येताच सर्व शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील, अशी माहिती समोर आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) शाळांबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही महापालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेने 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा घेतला आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पूर्वनियोजित पुरवणी परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येतील, अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Police Recruitment 2021: महाराष्ट्रात लवकरच 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार- अनिल देशमुख

एएनआयचे ट्विट-

तसेच, इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या 4 जानेवारीपासून डीडी सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते गुरुवार दुपारी साडेतीन ते साडेचार आणि सांयकाळी पाच ते सहा या कालावधीत A Special English Hour नावाने इंग्रजी विषयासाठी कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.