CM Uddhav Thackeray: उघडलेली शाळा पुन्हा बंद होणार नाही याची दक्षता घेऊ, मुख्यमंत्र्यांचे अवाहन
Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी प्रादुर्भाव अत्युच्च असलेल्या काळात बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या. तब्बल दीड वर्षांनी शाळा सुरु होत असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसह शैक्षणिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. या संवादावेळी विद्यार्थी आणि पाल्यांची काळजी घ्या. दारं, खिडक्या उघडी करा. मोकळं ढाकळं वातावरण ठेवा. शाळा परिसर निर्जंतुकीकरण करा. जेणेकरुन उघडलेली शाळा पुन्हा बंद होणार नाही यासाठी दक्षता घेऊया असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील शाळा सुरु करताना मुख्यमंत्र्यांनी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' मोहिमेची घोषणा केली आहे. ही मोहीम अधिक प्रभावी राबवली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सर्व शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनालाईन संवाद साधला. या संवादावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच, आजचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे. (हेही वाचा, Mumbai School-College Reopen: आजपासून शाळा, महाविद्यालये सुरु होणार, 'या' नियमांचे करावे लागणार पालन)

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रत्यक्ष काही शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, #माझे_विद्यार्थी_माझी_जबाबदारी मोहिमेंतर्गत कुलाबा येथील या BMC शाळेतील व्यवस्था वैयक्तिकरित्या तपासली. या वेळी त्यांनी भेट दिलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केले. तसेच, शाळेतील वातावरण, निर्जंतुकीकरण तसेच स्वच्छतेचा आढावा घेतला. या वेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी एसओपीचे पालन करणे आवश्यक आहे. आमचा विभाग राज्यभर अशाच प्रकारच्या भेटी देत असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक कविता शेअर करुन शाळेत परतणाऱ्या मुलांचे स्वागत केले आहे.