अवघं जग मागील 2 वर्षांपासून कोविड 19 जागतिक आरोग्य संकटाचा (COVID 19 Pandemic) सामना करत आहे. आता या संकटाचा धोका कमी झाला असला तरीही संकट पूर्णपणे शमलेले नाही. पण सध्या मुंबईमधून (Mumbai) एक मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील दोन वर्षांत पहिल्यांदाच सोमवार 22 मार्च दिवशी मुंबई शहरात एकही नवा कोविड 19 चा रूग्ण हॉस्पिटल मध्ये भरती झालेला नाही. कोरोनाच्या तिसर्या लाटेनंतर आता मार्च 2022 मध्ये नव्या कोरोना रूग्णाच्या संख्येत कमालीची घट पहायला आहे.
बीएमसी अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीमध्ये,'जरी मागील 12 दिवसांपासून मुंबईत नव्या रूग्णाची संख्या एकअंकी असली तरीही पालिकेने 26500 कोविड बेड सज्ज ठेवले आहेत. मुंबई मध्ये कोरोनाच्या तिसर्या लाटेत 7 जानेवारीला कोरोना रूग्णसंख्या पीक वर म्हणजे दिवसाला 1400 रूग्ण रूग्णालयात दाखल झाले होते आणि आता हा आकडा शून्यावर आला आहे. हे देखील नक्की वाचा: COVID 19 In India: देशात कोविड 19 च्या नव्या रूग्णांमध्ये दिलासादायक घट; मागील 24 तासांत समोर आले 1,581 नवे रूग्ण .
एकेकाळी मुंबई शहर हे कोरोना संकटाच्या विळख्यात अडकलेले देशातलं सर्वात भयंकर शहर होतं. मात्र आता परिस्थिती बरीच सुधारली आहे. कोविड 19 संकट सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच मागील 24 तासांत एकही नवा रूग्ण हॉस्पिटलमध्ये भरती झालेला नाही. महाराष्ट्रातही स्थिती दिलासादायक आहे. मार्च 2020 मध्ये पाच वेळेस एकही रूग्ण दगावलेला नाही. तर सोमवारी नवी मुंबई मध्येही सलग 30व्या दिवशी एकही कोविड 19 मृत्यू नोंदवण्यात आला नाही.
नवी मुंबईचे मेडिकल ऑफिसर डॉ. प्रमोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्याकडून दिवसाला 5 ते 6 हजार टेस्ट केल्या जातात. पॉझिटिव्हिटी रेट आता बराच कमी झाला आहे. तर प्रौढांचे 100ं लसीकरण देखील करण्यात आले आहे. दिवसाची रूग्णसंख्या देखील मागील 3 आठवड्यांपासून 10 पेक्षा कमी आहे.