Photo Credit- X

Mumbai Rash Driving: मुंबईत पुन्हा रॅश ड्रायव्हिंगची घटना समोर आली आहे. बडया बिझनेसचा मुलगा ध्रुव नलिन गुप्ता याने आज शनिवारी 7 डिसेंबर रोजी पहाटे मुंबईतील वांद्रे येथे पार्क केलेल्या अनेक दुचाकींना पोर्श कारने (Porsche Car) धडक दिली. पहाटे 2.40  च्या सुमारास ही घटना घडली. घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. फूटपाथवर अनेक दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यावर त्याची पोर्शे कार आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी 19 वर्षीय तरुणाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल(Rash Driving Case) एफआयआर नोंदवला आहे. फुटेज आणि स्टेटमेंटच्या आधारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.(Chembur Road Accident: चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात भरधाव कारचा अपघात; दुभाजकावर आदळून टँकरला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू)

वांद्रा येथे बड्या उदयोजकाच्या मुलाच्या पोर्शे कारची दुचाकींना धडक