Chembur Road Accident: चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात भरधाव कारचा अपघात; दुभाजकावर आदळून टँकरला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजता हा अपघात झाला. रॅश ड्रायव्हिंग केल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
Chembur Road Accident: चेंबूर येथील गव्हाणपाडा (Gavanpada )परिसरात भरधाव वेगाने जाणारी कार(Speeding Car) दुभाजकाला धडकून तीन जणांचा मृत्यू झाला, तर आणखी जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजता हा अपघात झाला. रॅश ड्रायव्हिंग(Rash Driving) हे अपघाताचे कारण असल्याचे समोर आले आहे. प्रमोद शंकर प्रसाद (25), हरिचंदन दिलीप दास (23) आणि हुसेन शेख (40) अशी मृतांची नावे आहेत. (हेही वाचा:Aarey Colony Accident: आरे कॉलनी परिसरात दुचाकी खांबाला धडकल्याने तिघांचा मृत्यू )
जावेद सैफुला खान (30), मनोज मणी (30) आणि संजय सुखार सिंग (39) अशी जखमी प्रवाशांची नावे असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरे पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवालांतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी मुंबईत ३६ वर्षीय रिक्षाचालक गणेश यादव यांचा कारने चिरडून मृत्यू झाला होता. या घटनेत बबलू श्रीवास्तव हा मित्रदेखील एक जण जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Indapur Accident: इंदापूरमध्ये ट्रकचा भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू)
गणेश यादव वर्सोवा बीचवर झोपले असताना ही घटना घडली. एका एलिशान कारने त्यांचा चिरडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय निखिल जावळे आणि 33 वर्षीय शुभम डोंगरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अंधेरी कोर्टात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
रविवारी झालेल्या दुसऱ्या घटनेत मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात दुचाकीवरील तिघांचा आरे कॉलनी परिसरातील मुंडा चौकाजवळ एका खांबाला धडकल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2024 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

