Mumbai Rains Traffic Update: हिंदमाता, सायन परिसरात ट्राफिक जॅम टाळण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल; BMC चं ट्विट
Mumbai Monsoon (Photo Credits: Twitter)

Mumbai Traffic Advisory:  मुंबईमध्ये मान्सून आला होता पण पाऊस कधी पडणार? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. मात्र आज सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर सह महाराष्ट्रात धुव्वाधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पहिलाच पाऊस जोरदार असल्याने अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली आहे. पश्चिम, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूकीचा वेग मंदावल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत बीएमसीकडून अनेक ठिकाणी ट्राफिक वळवण्यात आलं आहे. Maharashtra Monsoon 2019 Live Updates: साचलेल्या पाण्याचा संध्याकाळपर्यंत निचरा होईल, मुंबई महानगरपालिकेचे आशादायी ट्विट

मुंबईत वाहतुकीचे मार्ग बदलले

मुंबईमध्ये वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. सायन, हिंदमाता परिसरात हे बदल करण्यात आले आहेत. आज संध्याकाळ पर्यंत पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे.