Mumbai Rains: मुंबई मध्ये आज वीजांच्या कडकडाटासह सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
Rain in Maharashtra | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो विविध भागात बरसण्यासाठी सुरूवात झाली आहे. दरम्यान आज (7 जून) पहाटेच्या सुमारास काही काळ पाऊस बरसल्यानंतर आता मुंबई हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई मध्ये वीजांच्या कडाकडाटासह मध्यम ते सौम्य स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो. यामध्ये मागील 24 तासांमध्येही मुंबईत सौम्य ते मध्य स्वरूपातील पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई वेधशाळेने सकाळी 7 वाजता जारी केलेल्या अंदाजपत्रात पुढील 3 तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

महाराष्ट्रात 10 जून नंतर   पुढील  काही दिवसांत पावसाचे राहणार आहेत. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हळूहळू पावसाचा जोर वाढला आहे. सध्या निम्मा महाराष्ट्र मान्सून दाखल झाला आहे. हा वेळेअगोदरच दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.  आणि शेतकर्‍यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. Maharashtra Monsoon 2021 Update: राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये मान्सूनचं आगमन.

KS Hosalikar Tweet

केरळ मध्ये 3 जूनला मान्सून दाखल झाल्यानंतर आता 7 ते 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे. यानुसार आता कोकण किनारपट्टी प्रमाणे राज्यात इतर जिल्ह्यांमध्येही मान्सून दाखल होण्यास सुरूवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक देखील सुखावले आहेत.