Mumbai Rains: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाच्या आगमनामुळे सोशल मीडियात युजर्सने दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
Photo Credit: File Image

Mumbai Rains: थंडीच्या दिवसात आता पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना नेमके काय करावे सुचत नाही आहे. आजपासून सुरु झालेल्या डिसेंबर महिन्यात पावसाच्या सरी बरसत असल्याने सकाळी ऑफिसला निघालेल्यांची तारांबळ उडाल्याची दिसून आले. तर हवामान खात्याने सुद्धा कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाला सकाळ पासून सुरुवात झाल्याने सोशल मीडियात युजर्सकडून विविध कमेंट्स केल्या जात आहेत.

आयएमडीने असे म्हटले होते की, मुंबई, पालघर, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी गडगडाटासह मध्य स्वरुपाचा पाऊस येत्या 2 डिसेंबर पर्यंत पडणार आहे. त्याचसोबत यल्लो अलर्ट ही जाहिर केला गेला. मात्र सोशल मीडियात पावसावरुनच नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पहा.(Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 2 डिसेंबर पर्यंत कोकण, मराठवाडा भागात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता)

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

दरम्यान, महाराष्ट्रातील किनारपट्टीपासून ईस्ट-सेंट्रल अरेबियन समुद्रात कमी दाबाचा पट्टा 1 डिसेंबरला निर्माण होणार असल्याची शक्यता आयएमडी यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात 30-40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह गडगडाटीसह पाऊस, हलक्या ते मध्यम स्वरुपात तो पडणार असल्याचे आयएमडीने जाहीर केले होते.