मुंबईत (Mumbai) सध्या मुसळधार पावासामुळे अनेक दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये 20 पेक्षा अधिक नागरिकांना बळी गेले आहेत. तसेच दुर्घटनास्थळी बचावकार्यसुद्धा वेगाने सुरु असल्याचे चित्र आहे.
तर काल मालाड येथे कुरार येथे मध्यरात्री भिंत कोळून 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच चांदिवली परिसरात सुद्धा रस्ता खचल्याने तेथे राहणाऱ्या रहिवाश्यांना तेथून हलवण्यात आले आहे. त्यामुळे अशा होणाऱ्या विविध दुर्घटनांच्या वेळी नेमके काय करावे हे काही वेळापूर्ते कळत नाही. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने काही आपत्कालीन क्रमांक जाहीर केले आहेत. आपत्कालीन क्रमांक पुढीलप्रमाणे:
-महाराष्ट्र नियंत्रण कक्ष: 022-22027990, फॅक्स: 022-22026712
-बृहन्मुंबई महानगरपालिका आतत्कालीन ऑपरेशन केंद्र: 1916, 022-22694725, 022-22694727, 022-22704403
-मुंबई- अग्निशमन आपत्कालीन टेलिफोन क्रमांक: 101 किंवा 022-23076111, 022-23086181,022-23074923, 022-23076112/13
-आपत्ती व्यवस्थापन कक्ष कंट्रोल रुम: महापालिका मुख्यालय, अनेक्स इमारत. तळघर, महापालिका मार्ग, मुंबई- 4000 001 संपर्क: 022-22694719/25/27
(रत्नागिरी: चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याने 24 जण वाहून गेल्याची भिती; 2 मृतदेह सापडले)
महाराष्ट्राला झोडपून काढलेल्या पावसाने मालाडप्रमाणेच कल्याण आणि पुण्यातही भिंत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये एकत्रितरित्या तब्बल 30 हुन अधिकांना प्राण गमवावे लागल्याचे समजत आहे.