Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

Mumbai Rains 8 July Update:  मुंबईकरांची यंदाची आठवड्याची सुरूवात दमदार पावसाने झाली आहे. आज मुंबई, नवी मुंबई सह उपनगरात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र सकाळपासून दमदार पावसाने पुन्हा कोसळायला सुरूवात केल्याने चाकरमान्यांची आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच त्रेधातिरपीट उडाली आहे. पावसाचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही दिसून येत असल्याने अनेकजणांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. मुंबईत काही सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाल्याने वाहतूक काहीशी मंदावल्याचं चित्र मुंबईमध्ये आहे. High Tide In Mumbai: मुंबई शहरात दमदार पावसाला सुरूवात; जुलै ते सप्टेंबर 2019 दरम्यानच्या भरतीचं वेळापत्रक BMC कडून जाहीर; पहा संपूर्ण यादी

काय आहे स्कायमेटचा अंदाज?

यंदा मुंबईमध्ये पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरीही सरासरीच्या निम्मा पाऊस आठवडाभरातच कोसळल्याने पाणी साठ्याच्या दृष्टीनेहे चित्र सकारात्मक आहे. मात्र सतत मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि द्रुतगती मार्गांवर खड्ड्यांमुळे रस्स्त्याची चाळण झाल्याने वाहतूक मंदावली आहे परिणामी ठिकठिकाणी ट्राफिक पहायला मिळत आहे.

आज संध्याकाळी 4.18 मिनिटांनी मुंबईमध्ये मोठी भरती आहे. तिन्ही मार्गावरील लोकल धीम्या वेगाने पण सुरू आहेत.