Mumbai Rain Live Update | (Photo Credits: ANI)

मुंबईत संततधार पावसाने रात्रभर हजेरी (Mumbai Rain Live Update) लावली. गेली काही दिवस दडी मारुन बसलेला पाऊस मध्यरात्री बाहेर आला. इतका की अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी घरं कोसळून नागरिक ठार झाले. चेंबुर येथे घरं कोसळून 10 लोक ठार झाले आहेत. एनडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्य करत आहे. ढिगाऱ्याखली आणखीही काही लोक अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री 12 वाजण्येच्या सुमारास सुरु झालेला पाऊस रविवारी (18 जुलै) पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत सुरुच होता. मुंबई (Mumbai) आणि मुंबई उपनगर अशा दोन्ही ठिकाणी पाऊस जोरदार पाऊस (Mumbai Rain) पाहायला मिळाला. सकल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणं जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.

कोणत्या ठिकाणी किती पाऊस?

दहिसर, सांताक्रूज, मीरा रोड, वांद्र्यात २०० मिमीहून जास्त पाऊस!

मुंबईच्या अनेक भागांमध्ये रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. रात्री ३.३० वाजेपर्यंत मुंबईच्या काही भागांमध्ये २०० मिमीहून जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबईत 3 मोठ्या दुर्घटना; चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप येथे भिंत कोसळून एकूण 15 जणांचा बळी)

सांताक्रूज - 217.5 मिमी

कुलाबा - 178 मिमी

महालक्ष्मी - 154.5 मिमी

वांद्रे - 202 मिमी

जुहू विमानतळ - 197.5 मिमी

राम मंदिर - 171.5 मिमी

मीरा रोड - 204 मिमी

दहिसर - 149.5 मिमी

भायंदर - 174.5 मिमी

चेंबुर येथे 10 जण ठार

मध्यरात्री झालेल्या पावसामुळे चेंबुर येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनेचा माहिती कळताच एनडीआरएपच्या जवानांचे एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफचे जवान येईपर्यंत स्थानिकांनी दोन मृतदेही मातिच्या ढिगाऱ्याखालून काढले. तर एनडीआरएफच्या जवानांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले.