प्रातिनिधिक प्रतिमा

रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुजोरी ही मुंबईकरांसाठी नेहमीचीची गोष्ट झाली आहे. पण आज (18 जुलै) मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल स्टेशनवर (Mumbai Central Station) प्रवाशांसोबत मुजोरपणे वागणार्‍या टॅक्सीचालकांना आरपीएफने धडा शिकवला आहे. आरपीएफने (Railway Protection Force) भाडे नाकारणार्‍या 22 टॅक्सी चालकांना अटक केली आहे. अशाप्रकारे मुंबईमध्ये आरपीएफने कारावाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बोगस, मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई; रिक्षा प्रवासाच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जारी

आरपीएफने अटक केलेल्या या टॅक्सी चालकांची थोड्या वेळाने दंड वसूल करून सुटका करण्यात आली आहे. अटक केलेल्या टॅक्सी चालकांना 300 रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका अधिकार्‍याच्या माहितीनुसार, ' आता प्री पेड आणि मीटर प्रमाणे जाण्यास नकार देणार्‍या टॅक्सी चालकांविरोधात येणार्‍या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. आता या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जाणार आहेत'. आरटीओ अशाप्रकारची कारवाई करते.

सोमवारी मुंबईत घाटकोपर येथून एक टॅक्सी ड्रायव्हर 700 रूपये आकारले असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आरपीएफने मुंबई सेंट्रल स्टेशनबाहेर प्रवाशांसोबत मुजोरपणे वागणार्‍या टॅक्सीचालकांविरोधात कारवाई करायला सुरूवात केली आहे. मुंबई सेंट्रलवर स्थानकावर लोकल प्रमाणेच उत्तर भारताच्या दिशेने प्रवास करणार्‍या अनेक महत्त्वाच्या ट्रेन्सची ये-जा असते त्यामुळे या स्थानकाजवळ मोठी गर्दी असते. अशातच टॅक्सी चालकांची मुजोरी सुरू असल्याने अनेकदा वाद होतात.