Mumbai Pune Expressway Representative (Photo Credits: Facebook)
Mumbai Pune Highway Traffic Update: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर आडोशी बोगद्याच्या मार्गी गेल्या चार दिवसांपुर्वी दरड कोसळल्याची घटना घडली होती. २३ जुलै च्या रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. या घटने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या संदर्भात हायवे पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे. सदर दरड मधील डोंगरावरील अडकलेले दगड पाडण्यासाठी दिनांक 27/07/2023 रोजी 12.00 ते 14.00 दरम्यान एक्सप्रेस वे वरील मुंबई वाहिनी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुण्यातील या रस्त्यावर वाहतुकांना बंदी करण्यास आली आहे.  राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पोलिसांनी ही माहिती ट्विटर वर शेअर केली आहे.