Accident | File Image

मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर सलग दुसरा दिवस देखील अपघाताच्या बातमीने हादरवणारा आहे. आज (3 मार्च) दिवशी खंडाळा घाटामध्ये खोपोली एक्झिट जवळ ट्रक आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातामध्ये गाडीचा चुराडा झाला असून एकाचा मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 3च्या सुमारास झाला आहे. दरम्यान या अपघाताचं कारण समजलेले नाही. मात्र हे वृत्त समजताच महामार्ग पोलिस, रूग्नवाहिका सोबतच अन्य यंत्रणा घटनास्थळी पोहचली. दरम्यान या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कालच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका टेम्पोच्या धडकेमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 बाईकस्वारांना उडवण्यात आल्याची घटना समोर आली होती. या अपघातामध्ये तरूणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील साखर कारखाना कर्जपुरवठा विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण (Ranveer Chavan) यांचा देखील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.  त्यांची आज साखर कारखान्याच्या कर्जाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मंत्रालयात बैठक होती. मुंबई-पुणे महामार्गावर टोलच्या दरात येत्या 1 एप्रिलपासून वाढ, वाहनचालकांना बसणार फटका.  

सतत वर्दळीच्या असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवर सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी वाहतुकीच्या नव्या नियमांनुसार खाजगी वाहन चालकांना ताशी 120 किमी पर्यंत वेग वाढवण्याची मुभा आहे. तर राज्य सरकारच्या व खाजगी बसलादेखील ताशी 100 किमी इतक्या वेगात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहन चालवण्याची अनुमती देण्यात आली आहे.