Mumbai Pune Expressway (Photo Credits: x/@CivilEngDis)

मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वरील प्रवास आता वेगवान होणार आहे. सध्या मिसिंग लिंकचे (Missing Link)  काम सुरू असताना एमएसआरडीसीने (MSRDC) हा रस्ता सहा ऐवजी आठ पदरी करण्याचा प्रस्ताव केला आहे. सुमारे 70 किमीच्या रस्त्यासाठी 100 हेक्टर जागा आवश्यक आहे. त्यासासाठी राज्यसरकार कडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आठ पदरी रस्त्याला मंजुरी मिळाल्यास एक्सप्रेस वे ची क्षमता वाढणार आहे.

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील वर्दळ पाहता हा रस्ता वाढवण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. हा एकूण 94 किमी लांबीचा रस्ता आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागामध्ये 13.3 किमी चा पर्यायी रस्ता आहे. जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये 1.67 किमीचा 8.92 किमीचा बोगदा आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे.

खालापूर टोल ते खोपोली एक्झिट हा आठ पदरी आहे. त्याच्या पुढे आता उर्से टोल नाकापासून आठ पदरी रस्ता करण्याचे काम एमएसआरडीसी ने प्रस्तावित केले आहे. संपूर्ण एक्सप्रेस वे आठ पदरी झाल्यास त्यावरील प्रवास विनाअडथळा होणार आहे. सध्या हा प्रस्ताव सरकार दरबारी असल्याची माहिती आहे. Mumbai: प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग 11 फेब्रुवारीपासून सहा महिने बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते .

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर, पहिल्या टप्प्यातील बांधकाम कामासाठी 2500  कोटी रुपये दिले जातील. प्रकल्पाची किंमत अंदाजे 5000 कोटी रुपये आहे. यामध्ये बांधकाम आणि भूसंपादन यांचा समावेश आहे.  सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दररोज सुमारे 60-70  हजार वाहने धावतात. विकेंडला  ही संख्या 90 हजारच्या आसपास असते.