मुंबई-पुणे एक्सप्रेस वे येथे दोन नव्या पुलांची उभारणी करणार, वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची सुटका होणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई-पुणे (Mumbai-Pune) एक्सप्रेस वेवर दोन नव्या पुलांची लवकरच उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही. त्याचसोबत राज्य सरकारकडून एक्सप्रेसवेच्या कामाला सुरुवात आहे. तर प्रवाशांना या दोन नव्या पुलांच्या उभारणीमुळे फक्त 6 किमी अंतर पार करावे लागणार आहे.

अमृतांजन पूल आणि संपूर्ण बोरघाट टाळून मुंबई-पुण्याचा प्रवास करणे सोईस्कर होणार आहे. याकरिता दोन मोठे बोगदे आणि पूल बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी बोगद्याच्या कामाला सुरुवात खालापूर येथून सुरु झाले आहे. संपूर्ण प्रकल्पासाछी 4 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे बोलले जात आहे.

(मुंंबई: नाल्यांंमध्ये कचरा टाकणार्‍यांना होणार पोलिस आणि दंडात्मक कारवाई; BMC चा नवा प्लॅन)

तर उभारण्यात येणाऱ्या पहिल्या पूलाची सुरुवात खोपोली येथून करणार आहे. तसेच 770 मीटर लांब आणि 30 मीटर उंचीचा हा पूल उभारण्यात येणार आहे. त्याचसोबत दोन्ही बाजूने वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.