मुंंबई: नाल्यांंमध्ये कचरा टाकणार्‍यांना होणार पोलिस आणि दंडात्मक कारवाई; BMC चा नवा प्लॅन
मुंबई महानगरपालिका (Photo Credits: Facebook)

मुंबईत पावसाळ्यात ड्रेनेज लाईनमध्ये कचरा अडकून पाणी साचून राहण्याचं प्रमाण मोठं आहेत. अनेकदा त्याचा परिणाम वाहतूकीवर होतो आणि बघता बघता मुंबई 'तुंबई' होते. पालिकेने यंदा या समस्येला कारणीभूत ठरणार्‍या उपद्रवी नागरिकांना 'फाईन' मारण्याचा नवा प्लॅन आणला आहे. यानुसार नाल्यांमध्ये कचरा फेकर्‍यांना आता किमान 200 रूपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. मुंबई मध्ये लवकरच मान्सून दाखल होणार; BMC कडून 180 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता व्यक्त

मुंबई महानगर पालिका आता मुंबईच्या 24 विविध वॉर्ड्समध्ये एक टीम तैनात करणार आहे. त्यांच्यासोबत एक मुंबई पोलिस अधिकारी असेल. जर एखादी व्यक्ती नाल्यात, ड्रेनेज लाईनमध्ये कचरा टाकताना दिसली तर त्या व्यक्तीला दंड आकारला जाणार आहे. पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ड्रेनेज लाईन्स स्व्च्छ केल्या आहेत. मात्र त्यामध्ये कचरा न टाकण्याचं आवाहन करूनही नागरिक कचरा टाकत असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यामध्ये व्यत्यय येत असल्याचं पालिका अधिकारी प्रविण परदेशी यांनी TOI शी बोलताना सांगितले आहे.

पोलिसांच्या धाकाने नागरिकांमध्ये नाल्यांमध्ये कचरा टाकण्याची भीती वाढेल. परिणामी पाण्याचा प्रवाह आणि निचरा या दोन्ही गोष्टी उत्तमरित्या झाल्याने मुंबईकरांना होणारा नाहक त्रास कमी होईल.

बीएमसी यंदापासून स्वच्छ केलेल्या नाल्यांचे फोटो काढून ठेवणार आहे. त्यामुळे आता तक्रारीची तपासून करून त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या तक्रारी पालिकेच्या MCGM 24X7 app  वर करण्याची सोय आहे.