Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील  विचित्र अपघातात दोन ट्रक जळून खाक
Accident (PC - File Photo)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे (Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामध्ये अनेक नागरिंकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील (Mumbai-Pune Expressway) भातण बोगद्यात (Bhatan Tunal) तीन वाहनांचा मोठा अपघात झाला आहे. अपघातात तिनही वाहने जळून खाक झाली आहेत. भाताण बोगद्यात शोल्डर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला एका छोट्या टेम्पोने मागून धडक दिली आणि मागून येणारा टेम्पो अपघातग्रस्त गाड्यांवर आदळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा - Samruddhi Mahamarg Thane: शाहापूरात मोठी दुर्घटना, समुध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी गर्डर मजूरांच्या अंगावर कोसळली; 15 ते 20 जणांचा मृत्यू)

अधिक माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर हा अपघात झाला आहे. अपघातात तिनही वाहने जळून खाक झाली आहेत. भाताण बोगद्यात शोल्डर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला एका छोट्या टेम्पोने मागून धडक दिली आणि मागून येणारा टेम्पो अपघातग्रस्त गाड्यांवर आदळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची प्रथमिक माहीती समोर आली आहे. पहाटे साडे तीन चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

समृद्धी महामार्गावर देखील अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्याच महिन्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघातात तब्बल २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.