मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर आज (30 नोव्हेंबर) 3 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. आज दुपारी 12-3 या वेळेमध्ये हा ब्लॉक असेल. या तीन तासांसाठी महामार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. पण या वेळेत मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणार्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खोपोली (Khopoli) ते पाली फाटा (Pali Phata) राष्ट्रीय मार्गावरील पुलासाठी 50 टन वजनाचे गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे.
मुंबई-पुणे मार्गावरील ब्लॉक दरम्यान वाहतूक खालापूर टोल नाक्याजवळील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे वाहतूक खालापूर टोलनाका येथे 1 किलोमीटर अंतरासाठी पुणे लेनवरून वळविण्यात आली आहे. आज मुंबई-पुणे महामार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पाली फाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम केले जात आहे.
मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यादरम्यान ब्लॉक घेऊन कामं केली जात असल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा आणि गोंधळ होत असल्याचं दिसत आहे.परंतू या महामार्गावर वाढते अपघात आटोक्यात आणण्यासाठी विशेष यंत्रणा बसवण्याच काम सुरू असून त्यासाठी ठराविक वेळेसाठी वारंवार ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वर काही दिवसांपूर्वी अभिनेता योगेश सोहनीला लुटणारा आरोपी 2 दिवसांत गजाआड .
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात उभारण्यात येत असलेल्या पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नविन रस्ता बांधण्याच्या कामाने वेग घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांचा वेळ आता 20-25 मिनिटं वाचणार आहे. जानेवारी 2024 पासून ही नवी मार्गिका खुली केली जाणार असल्याचा अंदाज आहे.