Mumbai Monorail | Image Used for Representational Image Only | (Photo Credits: PTI)

मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान व्हावा या करिता मुंबई लोकल्ससोबत मोनो (Mono Rail) आणि मेट्रो ट्रेन्स सुरू करण्यात आल्या मात्र लोकलसेवेसोबत मोनो रेल्वेचंदेखील रडगाणं सुरू आहे. आज वडाळा- चेंबूर (Wadala-Chembur Mono Rail) या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस हा प्रकार घडल्याने मुंबईकर मोनो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. यामध्ये चेंबूरच्या मोनो स्टेशनवरील मास्टरलादेखील नेमकं काय झालं आहे? मोनो रेल्वेची सेवा कधी पूर्ववत होईल? याची माहिती नाही.

ट्विट

मोनो रेल्वे अचानक ठप्प झाल्याने सध्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत दिले जात आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्याने मोनो रेल्वे बंद करण्यात आली आहे. अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

फेब्रूवारी 2014 मध्ये वडाळा ते चेंबूर पाठोपाठ मार्च 2019 मध्ये वडाळा ते गाडगे महराज चौक, महालक्ष्मी हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.