Mumbai Power Cut: मुंबईसह उपनगरात सोमवारी सकाळी अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. तर सर्व वीज कंपन्या जसे महावितरण, अदानी, टाटा आणि बेस्ट यांच्याकडून या घटनेची पुष्टी केली गेली. मात्र यामागील कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. परंतु वीज पुरवठा विभागाने लवकरच लाइट सुरळीत केली जाईल असे स्पष्ट केले. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा केली. त्याचसोबत मुंबईसह उपगनारांमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत.(Mumbai Power Cut Update: नवी मुंबई परिसरातील वीज पुरवठा सुरळीत; हार्बर मार्गावरील CSMT-पनवेल दरम्यान धावणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या पुन्हा सुरू)
वीज पुरवठा खंडीत झाल्याने रेल्वेला सुद्धा याचा फटका बसल्याचे दिसून आले. तेथे सुद्धा प्रवाशांच्या मदतीसाटी रेल्वे प्रशासनाने समन्वय साधावा असे निर्देशन उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याचसोबत काही ठिकाणी अपघात होणार नाही या दृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहण्यासह मदत करावी असे मुख्य सचिव आणि मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला सांगितले आहे. त्याचसोबत रुग्णांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीत सुरु रहावी जेणेकरुन अडचण होऊ नये याबद्दल महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सुचन्या दिल्या आहेत.(Mumbai Power Cut: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमधील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे ऑनलाईन परीक्षेमध्ये अडथळा; विद्यार्थ्यांनी केली ट्विटरवर तक्रार)
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 12, 2020
दरम्यान, सकाळी वीज पुरवठा खंडीत झाल्याने सोशल मीडियात सुद्धा त्याबद्दल युजर्सकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्यानंतर महापालिकेने सुद्धा ट्विट करत वीज पुरवठा खंडीत झाल्याचे स्पष्ट केले. मुंबईसह उपनगरात आज झालेल्या वीज पुरवठा खंडीत प्रकरणी लोकांची सुद्धा तारांबळ उडाल्याचे दिसून आले.