Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये (Mumbai) एका महिलेवर बलात्कार (Rape) आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेल्या ब्लॅकमेलरला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, या प्रकरणात महिलेच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. हा पती असे काही अश्लील व्हिडिओ मिळाल्यानंतर महिलेला ब्लॅकमेल करून घटस्फोट मागत होता. मुंबईजवळील देवनारमध्ये एका महिलेने याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दोघांनाही पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला.

त्यानंतर धमकी दिली की जर त्याला 5.20 लाख रुपये दिले गेले नाहीत तर तो ते व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करेल. महिलेने पैसे दिले नाहीत, त्यानंतर या व्यक्तीने ते व्हिडिओ त्या महिलेच्या पतीला पाठवले. महिलेचा आपल्या पतीवर आरोप आहे की, त्याने आपल्या पत्नीला सपोर्ट करण्याऐवजी तिला ब्लॅकमेल करून घटस्फोट मागण्यास सुरुवात केली. या पतीवर पत्नीचे असे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे.

आरोपी पती मुंबईहून उत्तर प्रदेश, श्रावस्ती येथील त्याच्या घरी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तेथून पकडले. त्यानंतर त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही लोकांवर बलात्कार, खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Thane: गॅस गळतीमुळे मृत्यू झाल्याचे भासवून पत्नीची हत्या करणारा आरोपी गजाआड)

दरम्यान, याआधी पत्नीच्या संमतीशिवाय जबरदस्तीने संबंध ठेवण्याच्या प्रकरणात मुंबईच्या सत्र न्यायालयाने एक विचित्र निकाल दिला होता. कोर्टाने म्हटले होते की, पत्नीशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या पतीने कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नाही. महिलेने तिची बाजू मांडताना, तिच्या पतीवर तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे तीला अर्धांगवायूचा झटका आला. आरोपी पतीने अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

यावर न्यायालयाने म्हटले होते की, आरोपी व्यक्ती महिलेचा पती आहे, त्यामुळे पती असल्याच्या नात्याने त्याने कोणतेही बेकायदेशीर काम केले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल.