Dahi Handi 2019: महाराष्ट्रातील पुरस्थितीमुळे मुंबईमधील राजकीय नेत्यांकडून दहीहंडीचा उत्सव रद्द
दहीहंडी उत्सव (Photo Credits-Twitter)

Dahi Handi 2019:  महाराष्ट्रातील विविध राज्यात निर्माण झालेली पुरस्थिती पाहता यंदा दहीहंडीचा (Dhai Handi) उत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन राजकीय नेते मंडळींकडून देण्यात आले आहे. तसेच मुंबईतील राजकीय नेते मंडळींच्या दही हंडीचे आयोजन सुद्धा याच कारणामुळे रद्द करण्यात आले आहेत.सर्वजण कोल्हापूर-सांगली मधील पुरग्रस्त भागातील नागरिकांना पुर्नवसानासाठी मदतीचा हात पुढे देऊ करत आहेत. त्यामुळे दहीहंडीच्या आयोजनासाठी वापरण्यात येणारी रक्कम यावेळी पुरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील मानाच्या दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. तसेच विजेत्या गोविंदा पथकाला भरघोस रक्कम बक्षिस म्हणून दिली जाते. मात्र यंदा राजकीय नेतेमंडळींनी आयोजित करत असलेल्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन रद्द केले आहे. तसेच दादर, कुर्ला, गिरगाव येथे राजकीय नेतेमंडळींच्या दहीहंड्या होणार नाहीत. तर राम कदम यांची घाटकोपर, आमदार प्रकाश सुर्वे आणि सचिन अहिर यांची वरळीमधील हंडीचे आयोजन रद्द करण्यात आलेले आहे.(यंदा राम कदम यांच्या दही हंडी सोहळ्याचे आयोजन रद्द, पुरग्रस्तांना मदत करणार)

त्याचसोबत ठाणे येथे सु्द्धा दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोशात दरवर्षी साजरा केला जातो. मात्र या वर्षी दहीहंडीचा उत्सव पारंपरिकरित्या साजरा करण्यात येणार असल्याचे आयोजनकांनी सांगितले आहे. तसेच दहीहंडीसाठी देण्यात येणारी बक्षिसाची रक्कमेत सुद्धा घट करण्यात येणार आहे. मात्र उर्वरित रक्कम पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे. ठाणे येथील टेंभी नाका, वर्तकनगर मधील संस्कृती प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या दहीहंडी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहेत.