संजय राऊत । PC: Twitter/ANI

15 फेब्रुवारीला संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवर हल्लाबोल केल्यानंतर आज दुसरी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्येही त्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या धाडसत्रावर भाष्य केले आहे. राज्यात आता महानगरपालिका निवडणूका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक वॉर्ड मध्ये आता धाडी पडतील असे म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार पाडण्याच्या हेतूने धाडी टाकत असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच 4 ईडी अधिकार्‍यांची मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तक्रार केली आहे. अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती ईडी अधिकार्‍यांच्या खात्यात जात असल्याचा खळबळजानक आरोप केला आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी 28 फेब्रुवारी दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 13 पानी पत्र लिहले असून त्यामध्ये ईडी अधिकार्‍यांच्या घोटाळ्याची माहिती दिल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी या ईडी अधिकार्‍यांची चौकशी सुरू केली आहे त्यानंतर काही जण तुरूंगातही जातील असा दावा केला आहे. वसुली रॅकेट मध्ये काही भाजपा नेत्यांचा समावेश असल्याचेही म्हटलं आहे. किरीट सोमय्या भाजपचे वसुली एजंट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: राहुल कनाल पाठोपाठ शिवसेनेच्या संजय कदम, आरटीओ अधिकारी  बजरंग खरमाटे यांच्या घरी देखील आयकर विभागाची धाड.

ANI Tweet 

दिवाण हाऊसिंग कडून ईडी अधिकार्‍यांच्या खात्यामध्ये वळवण्यात आले आहेत. तसेच जितेंद्र नवलानी हे रॅकेट चालवत असल्याचं म्हटलं आहे. ईडी भाजपाची एटीएम मशिन आहे असा दावा त्यांनी केला आहे. काही व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याचाही आरोप केला आहे.

राज्यातील पीएमसी बॅंकघोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवान यांच्यासोबत किरीट सोमय्या यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा पुनरूच्चार केला आहे. यावेळी सोमय्या बाप-बेटे जेलमध्ये जाणार म्हणजेच किरीट सोमय्या आणि नील सोमय्या जेलमध्ये जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.