मुंबई पोलीस (Mumbai Police) उप निरीक्षक धनाजी राऊत (Sub Inspector Dhanaji Raut) यांनी आज सकाळी ठाणे येथील वर्तक नगर (vartak Nagar) परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजत आहे. मिड डे च्या माहितीनुसार, राऊत हे मॉर्निंग वॉकला गेले असताना हा सर्व प्रकार घडला. राऊत यांची नुकतीच अंधेरी रेल्वे पोलीस स्थानकात बदली झाली होती. रायगड: सहायक पोलीस निरीक्षकाने पोलीस मुख्यालयात गळफास लावून केली आत्महत्या
प्राप्त माहितीनुसार, धनाजी राऊत हे नऊ महिने आधी पोलीस खात्यात सामील झाले होते. वास्तविक त्यांची मनस्थिती बिघडल्याचे किंवा कौटुंबिक समस्यांचे असे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही .वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धनाजी राऊत यांच्यावर सध्या तरी कामाचा दबाव नव्हता, त्यांना प्रोबेशन पिरेड असल्याने अगदी कमीतकमी काम सोपवले जात होते, त्यामुळे नक्की त्यांनी हे पाऊल का उचलले याबाबत अस्पष्टता आहे.
ANI ट्विट
Maharashtra: Police Sub Inspector Dhanaji Sakharam Raut, who was posted at Mumbai's Andheri Railway Police Station, allegedly committed suicide today morning by hanging himself.
— ANI (@ANI) September 30, 2019
दरम्यान, 2014 च्या जानेवारी पासूनचा रेकॉर्ड पाहिल्यास मागील साडेपाच वर्षांमध्ये तब्बल 807 पोलीस कर्मचाऱ्यांचा अकाली मृत्यू झाला आहे, यापैकी अनेक घटनांमध्ये हृदय विकारामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, कामाचा दबाव व सततची धावपळ यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडून अशा प्रकारचे दुर्दैवी प्रकार घडत असल्याचे ,सांगितले जात आहे.