Suresh Raina And Sussanne Khan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास मुंबई विमानतळ नजीक असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लब (Dragonfly club) येथे छापा टाकला. यावेळी सुरु असलेल्या पार्टीमध्ये उपस्थितांकडून मोठ्या प्रमाणावर कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुंबई पोलीस विभागाने 35 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina), इंटीरियर डिझायनर सुसान खान (Sussanne Khan ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांपैकी काही जण पंजाब, दिल्ली आणि राजस्थान येथील असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

इंग्लंड आणि विविध देशांमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत खबरदारी म्हणून मुंबईमध्ये सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, कर्फ्यूचे नियम धाब्यवार बसवून ड्रागन फ्लाय क्लब मध्ये पार्टी सुरु होती. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्या 27 जणांमध्ये क्लबमधील 7 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. (हेही वाचा, बॉलिवुड च्या प्रसिद्ध निर्मिती व्यवस्थापकाला जुहू येथे सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेट मधील संबंधातून अटक; मुंबई पोलिसांची कारवाई)

मुंबई पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये आढळून आले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केले जात आहे. नाईट कर्फ्यू आणि सोशल डिस्टन्सींगचेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाईक करत संबंदितांवर गुन्हे दाखल केले आहेत. अद्यापही तपास सुरु आहे. पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा, आणि भारतीय दंड संहिता कलम 188, साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.