मुंबईत दररोज हजारो-लाखोच्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात. तर प्रत्येक जण काही ना काही कामासाठी मुंबईत दाखल होते. तसेच परदेशी नागरिकांसाठी मुंबई हे एक पर्टनस्थळासारखेच आहे. याच पार्श्वभुमीवर रशिया येथून आलेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुंबई पोलीस धावले आहेत. कमला मिल-भायखळा येथून टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका रशियन महिलेचा फोन टॅक्सीतच रहिला. यावर मुंबई पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.
रशियातील महिलेचा फोन हरवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तो सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून काढला. तर महिला ज्या टॅक्सीत बसली होती ती टॅक्सी सुद्धा त्यांनी शोधली आहे. याबाबत पोलिसांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन अधिक माहिती दिली आहे. तर या घटनेसाठी त्यांनी #LostAndFound असा टॅग सुद्धा वापरला आहे.(The Punishing Signal: मुंबई पोलीस म्हणतात 'हॉर्न नॉट ओके प्लिज! नाहीतर ट्रॅफिकमध्ये बसा बोंबलत')
कमला मिल-भायखळा टॅक्सी प्रवासादरम्यान एक रशियन महिला, फोन टॅक्सित विसरल्याची माहिती भायखळा पो.स्टे ला मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पो.उ.नि रुपेश पाटील, पो.उ.नि जाधव, पो.उ.नि सागर खोंद्रे, पो.उ.नि परब, पो.उ.नि शिंदे यांनी टॅक्सी शोधून फोन महिलेच्या ताब्यात दिला. #LostAndFound
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 13, 2020
यापूर्वी मुंबई पोलिसांनी कुलाबा परिसरातून एका परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती. तर सदर महिला मूळ ब्राझीलची रहिवाशी होती. ती काही दिवसांपूर्वी मुंबईत पर्यटनासाठी आली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्यावर या महिलेने सरळ कफ परेड पोलिसांकडे धाव घेत आपली तक्रार नोंदवली होती. त्यानुसार महिलेने आरोपीचा तपास घेत अटक केली होती.