• Viral Video: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये एका माणसाने बांधला झोका, पिढे जे झाले ते पाहून येईल हसू
 • Z Class Security For Baby Elephant: हत्तीच्या पिल्लाला पालकांकडून 'झेड प्लस सुरक्षा'; मनमोहक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
 • Close
  Search

  Fake FDA Officer Arrested in Mumbai: औषधविक्रेत्याची फसवणूक, 30 वर्षीय तोतया एफडीए अधिकाऱ्यास अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

  अन्न व औषध प्राधिकरण (FDA) चा अधिकारी असल्याचे सांगून औषधविक्रेत्या दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या एका 30 वर्षीय तोतयास मुंंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. वर्धन रमेश साळुंखे (वय-30 वर्षे) असे या तोतयाचे नाव आहे. भाईंदर (Bhayandar) परिसरातील मेडीकल चालकांकडे जाऊन तो पैसे वसुलीचे काम करत असे.

  महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|
  Fake FDA Officer Arrested in Mumbai: औषधविक्रेत्याची फसवणूक, 30 वर्षीय तोतया एफडीए अधिकाऱ्यास अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
  Arrested | (File Image)

  अन्न व औषध प्राधिकरण (FDA) चा अधिकारी असल्याचे सांगून औषधविक्रेत्या दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या एका 30 वर्षीय तोतयास मुंंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. वर्धन रमेश साळुंखे (वय-30 वर्षे) असे या तोतयाचे नाव आहे. भाईंदर (Bhayandar) परिसरातील मेडीकल चालकांकडे जाऊन तो पैसे वसुलीचे काम करत असे. भाईंदर (पश्चिम) येथील पद्मावती नगर येथील मेडिकल स्टोअरचे मालक ललित भाटी यांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही अटक करण्यात आली.

  दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्याची धमकी

  भाटी यांनी पोलिसांकडे केलेली तक्रार आणि जबाबानुसार वर्धन रमेश साळुंखे नामक तरुण बुधवारी (8 मे) दुपारच्या सुमारास त्यांच्या दुकानात घुसला. त्याने आपली ओळख एफडीएच्या ठाणे युनिटमधील निरीक्षक अशी करुन दिली. शिवाय त्याने आपल्याकडे असलेले एक ओळकपत्रही दुकानदार भाटी यांना दाखवले. त्यानंतर त्याने औषध साठा नियमांचा दाखला दिला आणि आपण नियम आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचे दुकानदाराला सांगितले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्याची धमकी देत आरोपीने त्यांच्याकडे पैशांचीही मागणी केली. मात्र, दुकानचालक भाटी यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा,

  महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|
  Fake FDA Officer Arrested in Mumbai: औषधविक्रेत्याची फसवणूक, 30 वर्षीय तोतया एफडीए अधिकाऱ्यास अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
  Arrested | (File Image)

  अन्न व औषध प्राधिकरण (FDA) चा अधिकारी असल्याचे सांगून औषधविक्रेत्या दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या एका 30 वर्षीय तोतयास मुंंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. वर्धन रमेश साळुंखे (वय-30 वर्षे) असे या तोतयाचे नाव आहे. भाईंदर (Bhayandar) परिसरातील मेडीकल चालकांकडे जाऊन तो पैसे वसुलीचे काम करत असे. भाईंदर (पश्चिम) येथील पद्मावती नगर येथील मेडिकल स्टोअरचे मालक ललित भाटी यांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही अटक करण्यात आली.

  दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्याची धमकी

  भाटी यांनी पोलिसांकडे केलेली तक्रार आणि जबाबानुसार वर्धन रमेश साळुंखे नामक तरुण बुधवारी (8 मे) दुपारच्या सुमारास त्यांच्या दुकानात घुसला. त्याने आपली ओळख एफडीएच्या ठाणे युनिटमधील निरीक्षक अशी करुन दिली. शिवाय त्याने आपल्याकडे असलेले एक ओळकपत्रही दुकानदार भाटी यांना दाखवले. त्यानंतर त्याने औषध साठा नियमांचा दाखला दिला आणि आपण नियम आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचे दुकानदाराला सांगितले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्याची धमकी देत आरोपीने त्यांच्याकडे पैशांचीही मागणी केली. मात्र, दुकानचालक भाटी यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा, Mumbai Police Constable Injected With Poison: मोबाईल चोराचा पाठलाग करणार्‍या कॉन्स्टेबलच्या पाठीत खुपसलं विषारी इंजेक्शन; 3 दिवसांच्या उपचारानंतर पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू)

  कथीतपणे 75,000 रुपये दंड आकारणी

  प्राप्त माहितीनुसार, आरोपी वर्धन साळुंखे याने दुकानदार भाटी यांच्याकडे कथीतपणे 75,000 रुपये दंड आकारणी केली आणि कारवाई टाळण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली. दरम्यान, आरोपीच्या चुकीच्या वर्तनाचा संशय आल्याने भाटी यांनी स्थानिक मेडिकल स्टोअर मालक संघटनेचे सदस्य रुपेश चौधरी यांना माहिती दिली. त्यानंत सदर प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. (हेही वाचा, Virar: विरार येथे मद्यधुंद महिलांनी घातला गोंधळ, पोलिस अधिकाऱ्यांना घेतला चावा)

  दरम्यान, भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर मेडीकल दुकानदार घटनास्थळी आले. मात्र, आरोपी तत्पूर्वीच फरार झाला होता. इतक्यात आणखी एका मेडीकल दुकानदाराचा भोन भाटी यांना आला. त्यानेही अशाच प्रकारची एक व्यक्ती आपल्याला कारवाईची धमकी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला साळुंखे याला अटक केली आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 171 (लोकसेवकाची व्यक्ती करणे) आणि 385 (एखाद्या व्यक्तीला खंडणीची भीती घालणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरु आहे. तसेच, यापूर्वीही त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची राहिली आहे का? यासोबतच अशा प्रकारचा गुन्हा तो एकटा करतो आहे की त्यामागेही एखादे रॅकेट सक्रीय आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान अधिक तपशील हाती येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change