नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल
नारायण राणे (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे (Maharashtra Swabhimaan Paksh) अध्यक्ष नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू (Juhu) येथील सातमजली बंगल्याच्या विरोधात हायकोर्टात (high Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या दाखल केलेल्या याचिकेवर येत्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.

प्रदीप भालेकर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. नारायण राणे यांचा बंगला 2011 मध्ये उभारणीस सुरुवात केल्यानंतर 2012 मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. सातमजली या बंगल्याचे नाव अधिश असे असून जुहू आहे. तर सीआरझेड-2 कायद्यानुसार भालेकर यांनी नारायण राणे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर सीआरझेड-2 मध्ये समुद्रापासून 50 मीटरच्या आतमध्ये बांधकाम करण्याची परवानगी नाही.(हेही वाचा-नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष 'बादली' या चिन्हावर लढणार लोकसभा व विधानसभा 2019 च्या निवडणुका)

मात्र पालिकेने या प्रकरणी दुर्लक्ष केल्याचे याचिकाकर्त्याचे वकिल नितीन सातपुते यांनी सांगितले आहे. तर वारंवार पालिकेत याबद्दल सांगण्यात आले तरीही पालिकेकडून काही उत्तर दिले नाही. त्यामुळे आता हायकोर्टात भालेकर यांनी याचिका दाखल केली आहे.