नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष 'बादली' या चिन्हावर लढणार लोकसभा व विधानसभा 2019 च्या निवडणुका
नारायण राणे (फोटो सौजन्य-फेसबुक)

खासदार नारायण राणे (Narayan Rane) आगामी लोकसभा (Lok Sabha Elections 2019) आणि विधानसभा निवडणूकांसाठी (Maharashtra State Assembly Elections)  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार ( Maharashtra Swabhimani Party ) उभे करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. आता महाराष्ट्रात निवडणूकांसाठी सज्ज झालेल्या नारायण राणे यांना 'बादली' हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. बादली या चिन्हावर राणे निवडणूकांच्या रिंगणात उतरणार आहेत. शिवसेना-भाजप युतीला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत - नारायण राणे यांचे भाकीत

आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये कोकणवासीयांचा मेळावा आयोजित होणार आहे. या मेळाव्यात राजकीय वाटचालीवर राणे काय बोलणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. आजच्या मेळाव्यामध्ये कोकणातून आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे.

भाजपासोबत नारायण राणेंची जवळीक होती. त्यांच्या मदतीने राणेंना राज्यसभेचे खासदारपद मिळाले आहे. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती झाल्याने नारायण राणेंचा हिरमोड झाला आहे. नारायण राणे आगामी प्रचारामध्ये भाजपासोबत नसतील पण त्यांच्यावर टीका टाळणार आहेत. परंतू शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी निवडणूकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.