Chandra Grahan 2020: वर्षाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्यासाठी नेहरू तारांगणात लोकांची गर्दी
Chandra Grahan (Photo Credit: ANI)

वर्षाचे पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2020) पाहण्यासाठी नेहरु तारांगणात लोकांची गर्दी पाहायला मिळाली. चंद्रग्रहण पाहण्यासाठी जगभरातून उत्सुकता होती. वर्ष 2020 मधील पहिला चंद्रग्रहण 10 जानेवारी रोजी रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी सुरु झाले असून आज रात्री 2 वाजून 42 मिनिटांनी समाप्त झाले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये (Mumbai) चंद्रग्रहण पाहण्यासाठी लोकांनी दुर्बीन लावून बघितले. केवळ भारतातच नव्हे तर, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, अफ्रिका येथील नागरिकांनी चंद्रग्रहण पाहायला मिळाले.

सूर्य आणि चंद्र ग्रहणाचे वैज्ञानिक कारण सांगायचे झाल्यास, पृथ्वी सूर्याची आणि चंद्र पृथ्वीची परिक्रमा करत असतो. ही प्रक्रिया घडत असताना काही वेळा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते. या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र ग्रहण लागते. यातच वर्षाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्यासाठी  खगोलप्रेमींनी मुंबई येथील नेहरु तारांगणात गर्दी जमवली होती. Chandra Grahan 2020: वर्षातील पहिले चंद्रग्रहण 10 जानेवारीला; जाणून घ्या कोणत्या राशीवर कसा पडणार प्रभाव

एनएनआयचे ट्वीट-

वर्षाचे पहिले चंद्रग्रहण हे 4 तास सुरू होते. त्याचबरोबर खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरली आहे. मुंबईसह देशभरात खगोलप्रेमींनी चंद्रग्रहणाचा नयनरम्य अनुभव घेतला आहे.