Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

Mumbai: कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सर्वत्र लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. तर आता खासगी रुग्णालयात सुद्धा कोरोनाची लस दिली जात असून तेथे नागरिकांना त्यासाठी 250 रुपये मोजावे लागत आहेत. परंतु शासकीय रुग्णालयांसह केंद्रात फ्री मध्ये नागरिकांना लस दिली जात आहे. अशातच आता महापालिकेसोबत एनजीओ सुद्धा लसीकरणाच्या मोहिमेत मदत करणार आहे. एनजीओकडून गरीबांना लस दिली जाणार असून नागरिकांचा लसीनंतर सुद्धा फॉलोअप  घेतला जाणार आहे.(Maharashtra: मुंबईतील दादर मार्केटमध्ये आज सकाळी प्रचंड गर्दी)

राज्यात आतापर्यंत 60 वर्षावरील 10.98 लाख जणांना आणि 45-59 वयोगटातील नागरिकांसह सहव्याधी असलेल्यांना लस दिली गेली आहे. मुंबईत 2.77 लाख नागरिकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. आरोग्य कर्मचारी, महापालिकेने नेमलेले MoU यांच्यासह भारतीय जैन संघ हे कोरोनाच्या लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. अशातच आता एनजीओने सुद्धा यासाठी पुढाकार घेतला आहे.(Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन? राज्यात गेल्या 8 दिवसात जवळपास एक लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद)

भारतीय जैन संघाकडून कोरोनाच्या लसी संदर्भात लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात. तसेच त्यांच्याकडून कोरोनाची लस घेणारा व्यक्ती आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्व राखण्याचे काम सुद्धा बीजेएस यांच्याकडून केले जाते. तया व्यतिरिक्त नागरिकांमध्ये लस घेण्याबद्दल जनजागृती सुद्धा केली जात आहे. अशातच एनजीओ सुद्धा लस घेतलेल्या नागरिकांचा फॉलोअप घेणार असून जनजागृतीसाठी मोबाईल वॅन्सचा वापर करणार आहेत. दरम्यान या आठवड्यापासून नायर रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर, मुलुंड जम्बो सेंटर आणि दहीसर जम्बो सेंटरमध्ये कोवॅक्सि आणि कोविशिल्ड लस नागरिकांना दिली जाणार आहे.