Mumbai News: मुंबई लोकलमध्ये शनिवारी (३० मार्च) रोजी १५ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडली. प्रवाशांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरोपींना चांगलीच अद्दल घडवली आहे. अहमद नूर असे आरोपीचे नाव असून तो कामाठीरपुरा भागातील रहिवासी आहे. प्रवाशांच्या मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला आहे. लध्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शनिवारी (३० मार्च) रोजी दादर ते अंधेरी या स्थानकांदरम्यान रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. तेव्हा अल्पवयीन पीडित मुलगी आपल्या वडिलांसोबत रुग्णालयातून परतत होती. (हेही वाचा :Beed Minor Girl Rape Case: अल्पवयीन आरोपींकडून आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, बीड येथील धक्कादायक घटना )
ती आणि तिचे वडील दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनच्या जनरल डब्यात चढले. पीडित अल्पवयीन मुलगी वडिलांच्या विरुद्ध बाजूला बसली. आरोपी नूर येऊन मुलीच्या शेजारी बसला आणि लोकलमध्ये गर्दी असल्याने याचा फायद घेत आरोपी नूर अहमदने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर नूरने मुलीसमोर उभे राहून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. वडिलांना आरोपीच्या कृत्याचा संशय येताच त्यांनी धावत्या ट्रेनमध्ये मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार इतर प्रवाशांना समजताच प्रवाशांनीही नूरला चोप दिला. मुलीच्या वडिलांनी तसेच इतर प्रवाशांनी आरोपी नूर अहमदला अंधेरी स्थानकात उतरवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. प्रवाशांच्या मारहाणीत नूर जखमी झाल्याने त्याला आधी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा : Nalasopara Minor Girl Rape Case: नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला वाराणसीतून अटक)
आरोपीवर असे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहेत. त्याशिवाय, तो अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचेही पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.