Gold | fille Image

Mumbai News: दुबई ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सोन्याची तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीअटक केले आहे. आरोपीकडून साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने कारवाई केली आहे. सलीम सगीर इनामदाक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार तो रायगड जिल्ह्यातला रहिवासी आहे. तो सिंडिकेटचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलीम आणि साजिद हे दोघेही भांवडे दुबईतून सोन्याच्या तस्करीचे रॅकेट चालवत होता. डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले की सलीम पॅसेंजर, एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचारी व सोने वितळणारे यांच्यात अरेंजमेंट व कॉर्डिनेशन करत होता. डीआरआय अधिकाऱ्यांनी आरोपींकडून सुमारे 7.4 किलोग्राम सोने जप्त केले असून त्याची किंमत 4.51 कोटी रुपये आहे.

दुबई ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सोन्याची तस्करी करणारे वेगवेगळे लोक यात सहभागी होते.विमानात प्रवास करून मुंबईला पोहोचण्याची जबाबदारी एका प्रवाशाची असते. नंतर तो प्रवाशी आपल्या सीटवर सोनं ठेवायचा. काही वेळानंतर तो निघून गेल्यावर दुसरा एका व्यक्तीची म्हणजेच एअरलाईन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीने ते सोनं विमानतळावरून बाहेर आणले. त्यानंतर एका डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तीला डीआरआयच्या अधिकाऱ्याने अटक केली. हा सर्व प्रकरार उघडकीस आला. अधिकाऱ्यानी सर्वांना अटक केले आहे. सोनं वितळवण्यासाठी घेवून जात असताना सोनाऱ्याच्या दुकातील मालकाला देखील अटक केली आहे. अधिकारांनी आरोपीवर करावाई सुरुवात केली आहे.