Railway | Representational Image |(Photo Credits: PTI)

Kalyan Railway Station Accident News: कल्याण रेल्वे स्थानकावर (Kalyan Railway Station) एकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रेल्वेतून खाली उतरताना ही घटना घडली आहे.पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या डेक्कन क्वीन एक्प्रेसमधून खाली उतरताना त्यांचा तोल गेला. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाली 9.30 च्या सुमारास ही घटना कल्याण स्थानकावर घडली. मृत आणि जखमी व्यक्ती भाऊ भाऊ असल्याचे सांगत आहे.

डेक्कन क्वीन एक्प्रेस कल्यान स्थानकात थांबत नाही.तर या स्थानकावर एक्स्प्रेसचा वेग कमी होता.त्यामुळे काही जण धावती ट्रेन पकडण्याच्या किंवा उतरण्याच्या नादात असतात. तर आज देखील हे दोघे जण कल्याण स्थानकात उतरण्याच्या प्रयत्नात होते. तर तोल गेल्यामुळे दोघेही खाली कोसळले. त्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटना घडताच जमावाने गर्दी केली.  या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जीआरपीएफ यांनी घटनास्थळी धाव घेतला. या दुर्दैवी घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार हे दोघेजण पुण्याहून आले होते. जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.