
मुंबईतील एनसीबीच्या टीमकडून अशा एका गँगचा पर्दाफाश केला आहे जे ड्रग्जचे केक तयार करत होते. ऐवढेच नाही तर हे केक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना विक्री करत होते. एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी असे म्हटले की, त्यांना माहिती मिळाली होती की एक गँग आहे जी ड्रग्जचा वापर करुन केक बनवते. त्यानंतर हे केक हायप्रोफाइल ग्राहकांना विक्री केले जात होते.या प्रकरणी एनसीबीकडून एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे. या आरोपींचे इंस्टाग्रामवर एक पेज सुद्धा आहे. तेथून ते आपल्या केकबद्दल पोस्ट करुन नंतर डायरेक्ट मेसेज (DM) च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना केक पुरवत होते.
एनसीबीने असे म्हटले की, 830 ग्रॅम एडिबल विड पॉट बरौनी ज्याला एडिबल कॅनेबी सुद्धा म्हणतात त्याच्यासह 160 ग्रॅम मारिजुआना सुद्धा जप्त करण्यात आला आहे. त्या बेकरी मधून एनसीबीकडून एक महिला आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान, एनसीबीला ड्रग्ज सप्लायरबद्दल माहिती मिळाली. जगत चौरसिया असे त्याचे नाव असून त्याला वांद्रे येथून 125 ग्रॅम मारिजुआनासह अटक केली आहे.(धक्कादायक! घरात बनवलेली वांग्याची भाजी संपल्याने पतीला क्रोध झाला अनावर, पत्नीवर रॉकेल ओतून जिवंत जाळले)
अटक करण्यात आलेल्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट केकची ऑर्डर घेत होते. एक किलो केक जवळजवळ 10 तुकड्यांमध्ये केला जात होता. प्रत्येक केकचा तुकडा 1 हजार रुपयांना विक्री केला जात होता. हे भारतातील असे पहिलेच प्रकरण आहे जेथे ड्रग्ज पेडलेकर ड्रग्ज पासून तयार केलेले केक ग्राहकांना विक्री करत होता.
चौकशीदरम्यान असे समोर आले की, आरोपींनी इंटरनेटचा वापर करुन ड्रग्जचे केक तयार करण्यास शिकले. अशा पद्धतीचे केक गेल्या एका वर्षापासून ते तयार करत होते आणि विक्री करायचे. एनसीबीला त्यांच्याकडे ग्राहकांची लिस्ट मिळाली असून आता त्याबद्दल अधिक तपास केला जात आहे.