धक्कादायक! घरात बनवलेली वांग्याची भाजी संपल्याने पतीला क्रोध झाला अनावर, पत्नीवर रॉकेल ओतून जिवंत जाळले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

लातूर (Latur) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका माथेफिरू नव-याने शुल्लक कारणावरून आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. लातूर येथे हेर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आरोपीला घरी बनवलेली वांग्याची भाजी खायची होती. मात्र वांग्याची भाजी संपली आहे असे पत्नीकडून उत्तर मिळाल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळले आहे. या दुर्दैवी घटनेत आरोपीची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. पीडितेच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजलं आहे. सदर घटनेतील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, शादुल शेख असे आरोपीचे नाव आहे. तर फर्जाना शेख ह पीडित महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी फर्जाना हिने काल सकाळी घरी वांग्याची भाजी केली होती. यावेळी आरोपी पती शादुल आणि फर्जाना यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादामुळे शादुल घरी जेवण न करताच निघून गेला. पण रात्री शादुल दारू पिऊन घरी आला. मद्यधुंद असणाऱ्या शादुलने बायकोला सकाळी केलेल्या वांग्याची भाजी जेवायला मागितली. फर्जाना यांनी वांग्याची भाजी संपल्याचं पतीला सांगितलं.हेदेखील वाचा- Pune: लॉकडाऊनमध्ये वाढले पुरुषांवरील अत्याचार; समोर आली Domestic Violence ची धक्कादायक आकडेवारी

पण शादुलने वांग्याची भाजीच पाहिजे असा हट्ट धरला. यामुळे दोघांत पुन्हा वादाला सुरुवात झाली. पत्नीनं वांग्याची भाजी संपल्याच सांगितल्यानं पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं. या दुर्दैवी घटनेत पत्नी फर्जाना शेख गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. अवघी हजार-दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या या हेर गावात या घटनेनं खळबळ उडाली आहे.

या दुर्घटनेत अतिशय गंभीर भाजलेल्या फर्जाना शेख यांना गावकऱ्यांनी लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. फर्जाना यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शादूल शेखला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.